Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: चिंताजनक! राज्यात पुन्हा विक्रमी 14 हजार 888 नव्या COVID-19 रुग्णांची भर

मुंबई: राज्यात बुधवारी पुन्हा एकदा विक्रमी 14 हजार 888 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ही 7 लाख 18 हजार 711वर गेली आहे. तर 7,637 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 5,22,427 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.69% एवढे झालेले आहे. राज्यात असलेले गणेशोत्सवाचं वातावरण त्यामुळे झालेली गर्दी व मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचा वापर न करणं यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचं बोललं जात आहे.




