मुंबई – जागतिक बाजारातून आलेल्या संमिश्र प्रतिसादामुळे ३ दिवस तेजीत असलेल्या मुंबई शेअर बाजाराला आज मंदीचा ब्रेक लागला. त्यामुळे सकाळी निर्देशांकात ३०० तर निफ्टीत ७५ अंकांची घसरण झाली होती. त्यामुळे निफ्टीने ११ हजार ३५०चा स्तर तोडला होता. केमिकल कंपन्यांच्या समभागांमध्ये आज चांगली खरेदी झाली. त्यामुळे थिरुमलाई, कनोरिया आणि हिमाद्री केमिकल या कंपन्यांच्या समभागांमध्ये ५ ते ७ टक्क्यांची वाढ झाली होती.
जागतिक बाजारातील संकेतामुळे आणि नफा वसुलीमुळे आज सकाळपासूनच शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला. त्यामुळे निर्देशांक आणि निफ्टीत घसरण झाली. एनटीपीसी, झी एंटरटेन, पावर ग्रिड कॉर्पोरेशन, ओएनजीसी आणि हिंदाल्को या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. तर आयसीआयसीआय बँक, भारती इन्फ्राटेल, टायटन कंपनी, विप्रो आणि एचडीएफसी यांच्या समभागांमध्ये घसरण झाली होती.




