Breaking-newsपिंपरी / चिंचवड

उन्नतीच्या ‘बाप्पा माझा शाडू मातीचा’ उपक्रमाला गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात येत असलेल्या ”बाप्पा माझा शाडू मातीचा” उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे. शाडू माती आणि तुरटीपासून तयार केलेल्या अत्यंत आकर्षक गणेश मुर्ती वाटप केल्या जात आहे. या उपक्रमाला गणेश भक्तांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांनी कळविली आहे.

समाजात वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याची पध्दत उन्नती सोशल फाउंडेशनने रुजविली आहे. त्याचे समाजातील वेगवेगळ्या स्तरातून कौतुक होत असते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उन्नती फाउंडेशन (गणपती महोत्सव 2020) ”बाप्पा माझा शाडू मातीचा” हा पर्यावरण संवर्धनरुपी उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये शाडू आणि तुरटीपासून तयार केलेला गणेश मुर्ती लक्षवेधक ठरत आहेत. या मुर्ती घेण्यासाठी फाउंडेशनच्या कार्यालयात भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शाडूपासून बनविलेल्या 500 मुर्तींचे वाटप केले आहे. तर, तुरटीपासून बनविलेल्या 100 गणेश मुर्तींचे वाटप करण्यात आले आहे.

तुरटीपासून बनविलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तींचे वाटप ऐच्छिक दान याप्रमाणे करण्यात येत आहे. ज्यांना या गणेश मुर्ती हव्या आहेत, त्यांनी 9146087777 या व्हॉट्सअप क्रमांकावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group