Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

#CoronaVirus: रशियात कोरोनाच्या लशीच्या उत्पादनाचा पहिला टप्पा पूर्ण, भारतातही तयार होणार?

Share On

नवी दिल्ली: कोरोनाच्या लशीच्या स्पर्धेत सर्वात पहिला नंबर रशियानं लावलेला आहे. रशियाच्या लशीच्या उत्पादनातील पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाल्याची माहिती मिळालेली आहे. मात्र अनेक वैज्ञानिकांनी या लशीच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केलेली आहे. तर काही वैज्ञानिकांनी या लशीनं तिसरा टप्पा वगळल्याचा दावाही केला आहे. Sputnik V लस या महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होईल असा दावा आरोग्य विभागानं केलेला आहे.

कोरोनाची लस स्पुतनिक व्हीमध्ये आता भारतीय कंन्यांनीही स्वारस्य घेतलेलं आहे. भारतीय कंपन्यांनी रशियाच्या या लशीचं उत्पादन करण्यासाठी उत्साह दाखवला आहे. पहिल्या दोन चाचणीच्या टप्प्यातील माहिती रशियन डायरेक्टर इंवेस्टमेंट फंड RDIF ने भारतीय कंपन्यांना द्यावी अशा मागणी करण्यात आलेली आहे.भारतीय कंपन्या यासंदर्भात RDIF शी संपर्कात आहेत. सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. लशीच्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निकाल या कंपन्यांनी मागितलेले आहेत. RDIF या कंपनीनं कोरोनाच्या लशीच्या संशोधनासाठी भांडवल दिलेलं होतं. ही लस निर्यात आणि घुरगुती वापरासाठी वापरण्यात येऊ शकते असंही रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली आहे. RDIF सोबत भारतीय कंपन्यांची चर्चा यशस्वी झाली तर येत्या काही काळात ही लस भारतात तयार केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button