Breaking-newsआंतरराष्ट्रीय
डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट यांचे निधन

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच ही माहिती दिली.
‘मी अतिशय जड अंतःकरणाने सांगू इच्छितो की, माझा लहान भाऊ रॉबर्ट याचे शनिवारी रात्री उशिरा दुःखद निधन झाले. तो माझा केवळ लहान भाऊच नव्हता, तर एक चांगला जवळचा मित्र होता. त्याच्या मृत्यूमुळे माझ्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या गोड आठवणी याच मला भावी आयुष्यात वाटचाल करण्यास मदत करतील. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो’, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘तो माझ्यापेक्षा केवळ २ वर्षांनी लहान होता. त्यामुळे आमच्यात भावाच्या नात्यापेक्षा मैत्रीचे जास्त संबंध होते’, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.




![भारतीय लष्कराने उद्धवस्त केला पाकिस्तानी सैन्याचा तळ, पुरावे केले सादर [VIDEO] भारतीय लष्कराने उद्धवस्त केला पाकिस्तानी सैन्याचा तळ, पुरावे केले सादर [VIDEO]](https://i0.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Pak-Army-Base-Camp-2-620x400.jpg?resize=390%2C220&ssl=1)
