Breaking-newsराष्ट्रिय

देशात २४ तासांत तब्बल 52 हजार 509 नवीन कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने आता १९ लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल 52 हजार 509 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 857 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 8 हजार 255वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 39 हजार 795 इतका झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 5 लाख 86 हजार 244 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 12 लाख 82 हजार 216 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर 67.19 आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group