तांत्रिक बिगाड झाल्यामुळे भोसरी विद्युत दाहिनी राहणार बंद

तांत्रिक बिगाड झाल्यामुळे भोसरी विद्युत दाहिनी राहणार बंद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

तांत्रिक बिघाड असल्यामुळे भोसरी येथील विद्युत दाहिनी 10 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयातून देण्यात आली. ही विद्युत दाहिनी दुरुस्त करण्यात येणार आहे. दुरूस्तीसाठी 4 ते 10 ऑगस्टचा कालावधी घेण्यात आला आहे. दरम्यान, विद्युत दाहिनी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ही विद्युत दाहिनी बंद राहणार असल्यामुळे दरम्यानच्या काळात नागरिकांची हेळसांड होऊ नये, याची खबरदारी म्हणून महापालिकेने ही माहिती कळविली आहे. नागरिकांना येथील पर्यायी दाहिनीचा वापर करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *