Breaking-newsपिंपरी / चिंचवड

युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचा सलग दुस-या वर्षी शंभर टक्के निकाल

पिंपरी – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आज (बुधवारी) ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून चिंचवड येथील युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेने सलग दुस-यावर्षी शंभर टक्के निकालाची पंरपरा कायम राखली आहे.

या शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत . सुप्रिया नलावडे या विद्यार्थीनीने 91.08 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला, तर  ऋतुजा केळकर हिने 91.06 टक्के गुणांसह द्वितीय आणि  दर्शन हिंगणे हिने 90.02 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

चिंचवड येथील युनिक व्हिजन इंग्लिश  मीडियम शाळेच्या  दहावीच्या विद्यार्थ्यांची ही दुसरी बॅच होती. मागीलवर्षी या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला होता. यंदाही शंभर टक्के निकालाची पंरपरा कायम राखली आहे.

सलग दुस-यावर्षी शंभर टक्के निकाल लागल्याने शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यी व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष  गजानन चिंचवडे यांनी अभिनंदन केले  आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group