Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘टिली मिली’ कार्यक्रमातून शालेय शिक्षण

Share On

पुणे – कोरोना संकटामुळे जगभर शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मुलांच्या आरोग्याचा विचार करुन शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. या समस्येवर उपाय म्हणून भारतात टीव्ही (TV) या माध्यमाचा शिक्षणासाठी उपयोग करण्याचा निर्णय झाला आहे. सरकारी निर्णयानुसार महाराष्ट्रात सह्याद्री वाहिनीवर ‘टिली मिली’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या मुलांना मराठी (Marathi) भाषेत शालेय शिक्षण दिले जाणार आहे.

‘टिली मिली’ दहा आठवड्यांचा ४८० भागांचा कार्यक्रम
‘टिली मिली’ हा दहा आठवड्यांचा ४८० भागांचा मोठा कार्यक्रम आहे. याची सुरुवात २० जुलै रोजी झाली असून २६ सप्टेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. दररोज सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत इयत्तेप्रमाणे प्रत्येक वर्गासाठी विशेष कार्यक्रम सादर केला जाईल.

एमकेसीएलच्या नेतृत्वाखाली तयार झालेला कार्यक्रम
एमकेसीएल (MKCL) नॉलेज फाउंडेशन, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्यातील स्वयंसेवी संस्था यांनी संयुक्तपणे पहिली ते आठवीच्या मुलांसाठी पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘टिली मिली’ हा कार्यक्रम तयार केला आहे. याच पद्धतीने बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्याची मागणी होत आहे.

मराठी विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम
महाराष्ट्रात अनेक शाळांनी त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. पण ‘टिली मिली’ हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने तयार झालेला शैक्षणिक कार्यक्रम आहे. मराठी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाद्वारे अभ्यास करावा, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

वेळापत्रक
आठवी – सकाळी ७.३० ते सकाळी ८
सातवी – सकाळी ८ ते सकाळी ९
सहावी – सकाळी ९ ते सकाळी ९.३०
पाचवी – सकाळी ९.३० ते सकाळी १०
चौथी – सकाळी १० ते सकाळी १०.३०
तिसरी – सकाळी १०.३० ते सकाळी ११.३०
दुसरी – सकाळी ११.३० ते दुपारी १२
पहिली दुपारी १२ ते दुपारी १२.३०

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button