Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: औरंगाबादमध्ये आज 201 रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 4723, बळींचा आकडा 234

औरंगाबाद: जिल्ह्यात शनिवारी सकाळी 201 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झालेली आहे. यामधील 125 रुग्ण मनपा हद्दीतील, 76 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये 114 पुरूष, 87 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 4723 कोरोनाबाधित आढळले असून 2373 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेले आहेत. 234 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2116 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविलेले आहे.





