Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: न्यूयॉर्क शहरातील व्यवहार पुन्हा सुरू

Share On

अमेरिकेतील करोना साथीचे केंद्र ठरलेल्या न्यूयॉर्क शहरामध्ये सोमवारपासून सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. निर्बंध उठवण्याच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ४ लाख कर्मचारी पुन्हा कामावर हजर होणार आहेत.

सुमारे शंभर दिवस निर्बंधांमुळे न्यूयॉर्कमधील सर्व व्यवहार बंद होते. न्यूयॉर्कशहरात २२ हजार बळी गेले असून २ लाख पाच हजार रुग्ण आहेत. या शहरात मार्चच्या मध्यावधीत निर्बंध लागू करण्यात आले होते.

निर्बंध उठवण्यासाठीचे सर्व निकष न्यूयॉर्कने पूर्ण केले असून पहिल्या टप्प्यात निर्बंध उठवण्यात आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये लोकसंख्येची घनता जास्त असल्याने तेथे जास्त बळी गेले, असे गव्हर्नर अँड्रय़ू क्युमो यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्क शहर व न्यूयॉर्क राज्याला सर्वात जास्त फटका बसला होता.

शहर व राज्य दोन्हींची आर्थिक स्थिती बिकट असून संघराज्य सरकारच्या मदतीशिवाय तेथील परिस्थिती सुधारणार नाही. न्यूयॉर्क शहरात जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यू प्रकरणी निदर्शनेही मोठय़ा प्रमाणावर झाली होती. त्यामुळे विषाणूचा प्रसार आणखी वाढली असण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्कमध्ये रोज ३५ हजार चाचण्या करण्यात येत असून निदर्शनामुळे संसर्गात वाढ झाल्याबाबत तपासणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ३३,५५६ ठिकाणची बांधकामे सुरू करण्यात येणार आहेत. न्यूयॉर्कवासीयांच्या मदतीने आम्ही शहर पुन्हा सुरू करीत आहोत, असे महापौर बिल द ब्लासियो यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्था, लोकांची रोजीरोटी पुन्हा सुरू होत आहे, हा न्यूयॉर्कवासीयांसाठी आनंदाचा क्षण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button