Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: आतापर्यंत ५१०९ नमुने नकारात्मक

अकोला शहरासह जिल्हय़ात करोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नकारात्मक अहवाल येण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत नकारात्मक अहवालांची एकूण संख्या ५१०९, तर सकारात्मक अहवाल आलेल्या एकूण रुग्णांची ७२६ आहे. अकोल्यात विषाणू संशोधन व तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यापासून नमुन्यांच्या चाचणीचे निदान लवकर होत आहे.





