Breaking-newsआंतरराष्ट्रीय

सोशल मीडियाला ताब्यात ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन : सोशल मीडियाशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं असणारं आंबट-गोड नातं हे काही लपून राहिलेलं नाही. याच नात्याची झलक काही दिवसांपूर्वी पाहता आली. त्याच धर्तीवर आता ट्रम्प यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 

सोशल मीडिया कंपन्या बंद करण्याचा धमकीवजा इशारा दिल्यानंतर आता ट्रम्प यांनी समाजमाध्यमं अर्थात सोशल मीडियावर सरकाचा हस्तक्षेप वाढवण्याच्या तरतुदी असणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ‘सीएनएन’चा हवाला देत ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. 

ओव्हल ऑफिस येथून या आदेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ट्रम्प यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत धोक्यात असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि धोका कमी करण्यासाठी आपण या निर्णयावर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button