Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus | पुण्यात दोन वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात

पुणे | पुण्याजवळील हवेली तालुक्यातील बकोरी येथील २ वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. आता खाजगी हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचारानंतर बाळ घरी परतले आहे. पालकांसोबत बाळ घरी आल्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अवघ्या दोन वर्षाचे बाळ कोरोनावर मात करून घरी परतले असल्याने बकोरीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून बकोरी कोरोनामुक्त झाले आहे.





