मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
भाजपाच्या आंदोलनावर ‘ट्रोल’करणारे कोण आहेत, तर महाविकास आघाडी सरकारचा भोंगळ कारभार बाहेर येवू नये म्हणून तीन पक्षांनी (काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी) एकत्र येवून तयार केलेली ‘ट्रोलआर्मी’ आहे, अशी टीका भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव आणि सरकारच्या अपयशी उपययोजना याविरोधात भारतीय जनता पक्षाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात शुक्रवारी ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन- मेरा आंगण-रणांगण’असे आंदोलन केले. यावरुन ‘महाराष्ट्रद्रोहीBJP’असा ट्रेंड करीत महाविकास आघाडीच्या समर्थकांनी सोशल मीडियावर भाजपाला लक्ष्य केले. याला प्रतित्त्यूर देताना चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
ट्ट्वीटर वर व्यक्त होताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, हे नेटकरी म्हणजे नेमके कोण तर सरकारचा भोंगळ कारभार बाहेर येऊ नये म्हणून तिन ही पक्षांनी मिळून तयार केलेली “ट्रोलआर्मी”आम्ही असल्या “नेटकर्यांना” नाही घाबरतं. जनतेला होणार्या त्रासावर बोलतचं राहू जिथे जिथे सरकार चुकणार तिथे ठोकणारचं…
त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाक् युद्ध आणखी तीव्र होणार आहे, असे चित्र दिसत आहे.




