फुटबाॅल नव्या भूमिकेत : रिकामे आहेत स्टेडियम, स्क्रीनवर गाइडलाइन

म्युनिच | शनिवारपासून युरोपमध्ये फुटबॉल सुरू झाले. लॉकडाऊनंतर खेळ दोन-अडीच महिन्यांपूर्वी होता, तसा दिसला नाही. कोरोनाने जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळावर मोठा परिणाम केला. स्टेडियममध्ये आवडता संघ आणि खेळाडूंना समर्थन करताना प्रेक्षक दिसले नाहीत. मैदानावर गळ्यात पडून आनंद व्यक्त करताना खेळाडू. डगआऊट, मैदानाबाहेर, ऑफिशयलचे वर्तन बदलल्या सारखे दिसले. पत्रकारही वेगळ्या पद्धतीने मुलाखत घेताना दिसले. या ८ गोष्टी, ज्या कोरोनादरम्यान बदलल्या आहेत.
टीव्हीचे पत्रकार काठीला मायक्रोफोन लावून दुरूनच खेळाडूंचे व काेचच्या मुलाखती घेत आहेत. मायक्रोफोनला प्लास्टिकचे आवरण आहे. पत्रकार परिषद व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे. गोल केल्यानंतर गळ्यात पडून जल्लोष करण्याऐवजी डिस्टन्सिंगचे पालन करत कोपऱ्याने भेट घेत आहेत. खेळाडू एकमेकांना थम्स अपने प्रोत्साहन देताहेत.




