Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्राचे साहित्य ‘रत्न’ निखळले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली

Share On

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार श्री रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असतांनाही रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य लिहीत गेले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे साहित्य’रत्न’ आज निखळले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button