Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनाशी लढण्यास तंत्रज्ञानाची मोठी मदत: पंतप्रधान

करोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठीही तंत्रज्ञानाची मोठी मदत होत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत १९९८ मध्ये पोखरण येथे करण्यात आलेल्या अण्विक चाचणीचीही आठवण काढली. “१९९८ मध्ये आजच्याच दिवशी आपल्या वैज्ञानिकांनी एक मोठी कामगिरी केली होती आणि तो भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण होता. दुसऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जे तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत त्या सर्वांना आम्ही सलाम करतो,” असंही ते म्हणाले.





