Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: १६१० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर…

Share On

करोना महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्या लोकांसाठी कर्नाटक सरकारने बुधवारी १ हजार ६१० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. याचवळी, महसूल वाढवण्यासाठी मद्यावरील उत्पादन शुल्क ११ टक्क्य़ांनी वाढवण्याचा निर्णयही सरकारने घेतला. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांमध्ये, टाळेबंदीमुळे ज्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे अशा हजारो धोबी, न्हावी, ऑटोरिक्षा व टॅक्सीचालकांसाठी प्रत्येकी पाच  हजार रुपये भरपाईचा समावेश आहे. याशिवाय, या पॅकेजद्वारे शेतकरी, फूल बागायतदार, लघू व मध्यम उद्योजक, मोठे उद्योग, विणकर आणि बांधकाम मजूर यांनाही मदत केली जाणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button