Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronoVirus:कराडमध्ये आणखी 10 जणांना कोरोनाची लागण

कराडमध्ये आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील 10 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. कराड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 70 वर पोहोचली आहे. तर सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आतापर्यंत 92 झाली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.





