Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वसईत आणखी १४ जणांना कोरोनाची लागण

वसई-विरार शहरामध्ये शनिवारी एकाच दिवशी १४ नव्या करोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या आता १५० एवढी झाली आहे. वसई-विरार शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.





