Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही

Share On

इस्लामाबाद | कोरोना व्हायरसच्या संकटात असलेल्या पाकिस्तानला अजूनपर्यंत कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच याला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसोबत बातचित केली. पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून एक डॉलरचीही मदत झालेली नाही, असं इम्रान खान म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान म्हणाले ‘कोरोनानंतरची स्थिती संपूर्ण जग आणि पाकिस्तानसाठी परीक्षा असेल. युरोप आणि अमेरिकेपेक्षा पाकिस्तानची स्थिती वेगळी आहे. लॉकडाऊनचा दुष्परिणाम पाकिस्तानवर झाला आहे. मला लॉकडाऊन लागू करायचा नव्हता, कारण मजूर आणि रोजंदारीवर कमावणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. पाकिस्तानमध्ये ७५ टक्के मजूर नोदंणीकृत नाहीत.’ इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेविषयीही चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागला आहे. कोणताही देश किंवा जागतिक संघटनेने पाकिस्तानला फुटकी कवडीही दिली नाही, पण आयएमएफने कर्ज फेडण्यासाठी दिलासा दिला आहे, असं इम्रान खान यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button