Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#YesBank: निर्बंध आजपासून मागे,बँकेचे व्यवहार सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्ववत

Share On

बुडीत कर्ज आणि व्यवहारातील अनियमिततेमुळे येस बँकेवर घालतेले निर्बंध आजपासून म्हणजे 18 मार्चपासून मागे घेण्यात येत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्च रोजी येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. मात्र आता येस बँकेच्या पुनर्बांधणीचा आराखडा सादर झाल्यानंतर बँकेचे व्यवहार आज सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्ववत होतील. यामुळे आता खातेधारकांना खात्यातून ५० हजारांहून अधिक रक्कम काढता येणार आहे. 

रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्च रोजी येस बँकेच्या  खात्यातून ५० हजारांहून अधिक रक्कम काढण्यास तसेच इतर व्यवहारांवरही निर्बंध घातले होते.  आता निर्बंध हटवल्यानं खातेदारांना अधिक रक्कम काढता येणार आहे तसेच बँकेची डिजिटल सेवाही पूर्ववत होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा नक्कीच मिळाला आहे…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button