Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Assembly Budget Session : मुनगंटीवार के हसीन सपने…जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सुधीर मुनगंटीवार यांना टोला

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

‘मुंगेरीलाल के सपने’ सारखे भाजपच्या मुनगंटीवार यांचे स्वप्न महाराष्ट्राला माहीत आहे . आम्ही ‘मुनगंटीवार के सपने’ असं पुस्तक पाच वर्षानंतर प्रसिद्ध करु, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे.

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले की, मुंगेरीलाल के सपने सर्वांना माहीत आहे तसे मुनगंटीवार यांचे स्वप्न महाराष्ट्राला आता प्रसिद्ध झाले आहे. सुधीर मुनगंटीवार हे पाच वर्ष वित्त मंत्री असताना फक्त महाराष्ट्रातील जनतेला स्वप्नेच दिली. त्यातील काहीच पूर्ण झाली नाहीत. आता विरोधी पक्षात आहेत. रोज – उद्या आपलंच सरकार येणार या स्वप्नात ते आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

रोज उठून मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा किंवा आणखी काही आलं तर हे दोन्ही पक्ष बाजूला होतील का? अशाप्रकारची स्वप्नरंजने मुनगंटीवार करत आहेत असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group