मोफत वीजेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत कलगीतुरा

मोफत वीजेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत कलगीतुरा

  • अजित पवारांचा विरोध, थोरातांचे समर्थन

मुंबई | महाईन्यूज

शंभर युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या घोषणेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरु झालेला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘लोकांना फुकट काही देण्याच्या घोषणा करणे बरोबर नाही, राज्याच्या आर्थिक स्थितीचाही विचार करावा लागेल’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत राऊत यांच्या मोफत वीज देण्याच्या घोषणेला विरोध केला आहे. तर, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऊर्जा मंत्र्यांचे जाहीर समर्थन केलेले आहे.

गरीब माणसाला मोफत वीज मिळावी, त्यादृष्टीने काय उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली. बाळासाहेब थोरात यांना त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, गरीबांना मोफत वीज देण्याबाबत उर्जामंत्री अभ्यास करीत आहेत. गरीबांना दिलासा देण्याचा ते विचार करीत आहेत, त्यात वावगे असे काही नाही, अशा शब्दात थोरात यांनी राऊत यांच्या घोषणेचे समर्थन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *