Breaking-newsमुंबई

‘तिथीचा हट्ट सोडा, १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा’; राष्ट्रवादी नेत्याचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Share On

मुंबई | महाईन्यूज

येत्या १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरी केली जाते. शासकीय तारखेनुसार १९ फेब्रुवारी शिवजयंती साजरी केली जाते. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचीशिवसेना तिथीनुसार साजरी करत आली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी तिथीचा हट्ट सोडा व १९ फेब्रुवारीला शिवजयंती तारीख जाहीर करा असं आवाहन राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

https://twitter.com/amolmitkari22/status/1223892403670548480

शिवजयंतीच्या तारखेवरुन वाद हा नवा नाही. दरवर्षी शिवसेनेकडून १९ फेब्रुवारीऐवजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. मागील सरकारमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी केली होती. इतकचं नाही तर शिवसेनेचे माजी खासदार यांनी चंद्रकांत खैरै यांनी सांगितले होते की, शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती मराठी तिथीप्रमाणेच साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button