२७ वाँटेड नक्षलवाद्यांचे पोस्टर्स केली जारी; लाखोंचे बक्षीसे जाहीर

२७ वाँटेड नक्षलवाद्यांचे पोस्टर्स केली जारी; लाखोंचे बक्षीसे जाहीर

झारखंड | महाईन्यूज

झारखंडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या लातेहारसह आसपासच्या परिसरातील नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या, वॉन्टेड आणि ज्यांच्यावर लाखोंचे बक्षीस असलेल्या २७ नक्षलवाद्यांचे पोस्टर्स अखेर लातेहार पोलिसांनी जाहीर केले आहेत. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक नागरिकांना मदतीचे आवाहन केलेले आहे. या सर्वांवर १ लाखांपासून ते तब्बल २५ लाखांपर्यंत बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेले आहेत.

लातेहार पोलिसांकडून ज्या २७ नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले गेले आहेत. अलीकडेच पलामू जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलेली होती. पोलिसांनी छतरपूर अनुमंडल येथून या पाचजणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले नक्षलवादी हे टीपीसी संघटनेशी संबंधित आहेत.

https://twitter.com/ANI/status/1224200060243566593

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *