भाजपने केली गरीबांना 2 रुपयात 1 किलो गव्हाचे पीठ देण्याची घोषणा …

दिल्ली | महाईन्यूज |
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून दिल्लीकरांची मते मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी वेगवेगळे फंडे वापरायला सुरुवात केली आहे. भाजपनेही गरीबांना दोन रुपये किलो गव्हाचे पीठ देण्याची घोषणा केली आहे. या शिवाय दिल्लीकरांना स्वच्छ पाणी देण्याचं आश्वासन ही भाजपनं दिलं आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांसाठी या घोषणा करण्यात आल्या आहेत.


भाजपने या निवडणूक जाहीरनाम्यातून अनेक घोषणा केल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील पहिल्या दोन मुलींना वयाची २१ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत इलेक्ट्रिक स्कुटी देण्याचा आणि इयत्ता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात येणार आहे.


केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या हस्ते भाजपच्या या ‘दिल्ली संकल्प पत्रा’चं जाहीर केलं आहे.





