Breaking-newsपिंपरी / चिंचवड

भाषेच्या शिक्षकांनी जिवंत स्पंदने टिपायला हवीत – डॉ. निलिमा गुंडी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भाषा शिक्षक हा समीक्षक होण्याबरोबरच कार्यकर्ता असला पाहिजे, नव्या आव्हानांचा स्विकार करत सूक्ष्म पातळ्यांवर जागे राहत त्याने जिवंत स्पंदने टिपायला हवी, अशी भूमिका ज्येष्ठ साहित्यिका डॉ. निलिमा गुंडी यांनी आज येथे व्यक्त केली.

मराठी अध्यापक संघ पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरामध्ये ‘भाषा शिक्षकांपुढील आव्हाने’ या विषयावरील सत्रामध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विषयाच्या तज्ञ डॉ. प्रिया निघोजकर होत्या. यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब लामखडे, यशवंत बेंद्रे, भास्कर पानसरे उपस्थित होते.

डॉ. गुंडी पुढे म्हणाल्या, भाषा शिक्षकाला एकाचवेळी अनेक भूमिका वठवता आल्या पाहिजेत. मूल्यसंस्कारासारख्या गोष्टीचं उत्तम साहित्य निर्माण करू शकतात. गद्याला लय असते हे त्याला व त्याच्या कानाला कळले पाहिजे. भाषेचा प्रत्यय ओळखता आला पाहिजे. तसेच मनातलं खोल ओळखणारी भाषा मुलांना त्याला शिकवता आली पाहिजे. भाषा हा समाजाचा प्रकाश असल्याने त्याच्या अर्थातील फटी त्याने लक्षात घेतल्या पाहिजे, असे डॉ. गुंडी यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. निघोटकर म्हणाले की, विदयार्थी ज्या सांस्कृतिक पर्यावरणातून आला आहे, त्याच्या उन्नती व प्रगतीसाठी भाषा शिक्षकाने त्याच्या पाठिशी उभे राहून त्याची भावसमृद्धी विकसित केली पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव यांनी केले. तर कृष्णाजी ढवळे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button