Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पवार साहेबांना माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : देवेंद्र फडणवीस

Share On

महाईन्यूज | पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे, या शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. अवघे 80 तास मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. आता विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी सत्तानाट्याविषयी वक्तव्ये केली आहेत. 

फडणवीस म्हणाले, की मी गेल्या पाच वर्षांत काय काम केले अथवा नाही केले, मला लोक नेता मानतात की नाही मानतात, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण पवारसाहेब हे पुरोगामी नेते आहेत व ते तसा थेट उल्लेख करू तर शकत नाहीत. पण अप्रत्यक्षरित्या त्यांना माझ्या जातीची आठवण करून द्यावीच लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे. दुसऱ्या गोष्टीची नाही, पण जातीची आठवण त्यांना प्रत्येक वेळी होते पण मी ब्राह्मण आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. पण दर वेळी काही ना काही निमित्ताने ते माझी जात बाहेर काढतात. मी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नक्कीच माझं स्थान काही कमावलेलं असेल. अन्यथा मी कोणत्या जातीचा आहे, हे आडून-आडून सांगण्याची गरज पवार साहेबांना पडलीच नसती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button