शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, ”नको ती सत्ता, आपण विरोधात बसू”, शिवसैनिकाची उध्दव ठाकरेंना साद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यातील सत्ता स्थापनेच्या नादात भाजपने गाठलेली पातळी पाहता शिवसैनिकांना याचा वीट आला आहे. सत्तेसाठी शिवसेना एवढी लाचार कदापी होणार नाही. ”नको ती सत्ता आपण विरोधात बसू अनं राज्यातील जनरेट्याच्या लाटेवर बाळासाहेबांचं स्वप्न साकार करु”, अशी साद शिवसेना पिंपरी विधानसभेचे समन्वयक विजय गुप्ता यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना घातली आहे.

शिवसैनिक विजय गुप्ता यांनी म्हटलं आहे की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आपली युती होऊ शकते हे समजलं तेव्हा माझ्यासह या अखंड हिंदुस्तानातील सच्च्या शिवसैनिकांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झाली. शिवसैनिक गरीब असला तरी लाचार आणि विकाऊ नाही, तो स्वाभिमानी आहे” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर जगणारा हा शिवसैनिक आहे. मात्र, या सत्तेत आपल्याला सापत्नभावाची वागणूक मिळत आहे.

आपलं आस्तित्व अबाधित राहणार असं तुम्ही सांगितल्यावर तमाम शिवसैनिक या सत्तेत सहभागी होण्यास तयार झाला. मात्र, आज राज्यातली परिस्थिती वेगळीच आहे. जरी राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्ष आपल्याशीच इमान राखत असल्याचे भासवीत असले तरी, आज त्यांच्या पक्षाची स्थिती काही वेगळी आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेला दगाफटका सहन करून तमाम शिवसैनिक शांत बसला. आपण जनतेने दिलेला कौल मान्य करून विरोधी बाकावर बसत पुन्हा जनतेच्या कामात झोकून देवूया.

येत्या दोन दिवसात महाशिवाघाडीच्या राज्यातील सत्तास्थापनेबाबत काही तोडगा न निघाल्यास माझ्यासह राज्यातील तमाम जनता व शिवसैनिकांचा मान राखून धनी माग फिरा अशी पुन्हा एकदा कळकळीची साद गुप्ता यांनी उध्दव ठाकरे यांना घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *