Breaking-newsआंतरराष्ट्रीय

ट्रम्प महाभियोगप्रकरणी उद्यापासून खुली सुनावणी

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग चौकशीत खुली सुनावणी बुधवारपासून सुरू  होत असून त्यात डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षातील स्फोटक शक्तिप्रदर्शन बघायला मिळणार आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार जो बिदेन व त्यांच्या पुत्राच्या युक्रे नमधील व्यवहारांची चौकशी करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणला होता.

प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीपुढे दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी सुरू होत असून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई झाली तर अशी कारवाई होणारे ते अमेरिकी इतिहासातील तिसरे अध्यक्ष ठरणार आहेत. त्या परिस्थितीत त्यांच्यावर अध्यक्षांच्या कर्तव्यात कसूर करण्याच्या आरोपाखाली सिनेटमध्ये  सुनावणी केली जाईल. प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅट पक्षाचे वर्चस्व असून २०१९ च्या अखेरीस महाभियोगाची कारवाई अंतिम टप्प्यात पोहोचू शकते. पण सिनेटमध्ये रिपब्लिकनांचे बहुमत असल्याने ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवून पदावरून काढून टाकणे सोपे नाही.

बुधवारी प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीपुढे जाहीर सुनावणी सुरू होईल. यापूर्वी सहा आठवडे बंद दाराआड जाबजबाब झाले होते. आतापर्यंतच्या सुनावणीत ट्रम्प  व त्यांच्या सहकाऱ्यांनी कशा प्रकारे युक्रेनवर दबाव आणला याचे पूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button