Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधमाची काढली नग्न धिंड

विरार – विरारमध्ये नुकतीच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी नराधम आरोपीची नग्न धिंड काढत त्याला अर्नाळा पोलीसांच्या हवाली केले.

विरारमध्ये 6 वर्षीय बालिकेवर इमारतीच्या आवारातच लैंगिक अत्याचार करणाऱ्या सहानी नामक नराधम सुरक्षारक्षकाला अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार समोर येताच परिसरातील संतप्त जमावाने बेदम चोप देऊन सुरक्षारक्षकाची भर रस्त्यात चोप देत नग्न धिंड काढून पोलिसांच्या स्वाधीन केले.

हा नराधम पीडित बालिकेच्या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाचे काम करायचा. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीसोबत वाईट कृत्य केले. मुलीने याची माहिती आपल्या पालकांना दिली. मात्र त्यानंतर तो फरार झालेला होता. स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेऊन आता त्याची नग्न धिंड काढली आहे. त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button