Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातून बेपत्ता झालेला तरूण छत्तीसगढमध्ये माओवादी कमांडर

पुणे – पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला तरूण छत्तीसगढमध्ये माओवादी कमांडर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्तीसगढ पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे त्यामध्ये या तरुणाची माहिती जाहिर करण्यात आली आहे.

संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा (वय २८) असे त्याचे नाव आहे. पुण्यातील भवानी पेठ भागात असलेल्या कासेवाडीमध्ये तो रहात होता.

नोव्हेंबर २०१० मध्ये तो बेपत्ता झाला होता. बरीच शोधाशोध केल्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार जानेवारी २०११ मध्ये नोंदवण्यात आली होती. त्यानंतर छत्तीसगढ पोलिसांनी माओवाद्यांची जाहिर केलेल्या यादीत त्याची माहिती समोर आली. शेलार हा रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया कमिटीचा डेप्युटी कमांडर आहे, अशीही माहिती छत्तीसगढ पोलिसांनी जाहिर केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button