अबब… तब्बल 58 किलो सोने चोरीला

अबब… तब्बल 58 किलो सोने चोरीला

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये तब्बल 58 किलो सोने चोरीला गेले आहेत. वामन हरी पेठे ज्वेलर्समधून 27 कोटी रुपयांचे 58 किलो सोने चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी ज्वेलर्सचा मॅनेजर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धा क्विंटलपपेक्षा अधिक सोने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या समर्थनगर परिसरातील वामन हरी पेठे शाखेतून हे सोने चोरीला गेले आहे.

वर्षभरापूर्वी ही जबरी चोरी झाल्याचं सांगण्यात येत असून, या गुन्ह्याची नोंद आज झाली आहे. मात्र वर्षभरापासून गुन्हा का दाखल केला नव्हता हा खरा प्रश्न आहे. या चोरीचा संशय मॅनेजरवर होता. त्यामुळे त्याची चौकशी सुरु होती. पण मॅनेजर उडवा-उडवी करु लागल्याने अखेर त्याच्याविरोधात आज गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *