Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार दाखल

Share On

औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांना आता चिरडावे लागेल. याची सुरुवात बेगमपुरा भागातून करावी लागेल, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी असे वक्तव्य जलील केले होते. तसेच बेगमपुरा भागात अफसर खान यांचा पत्त्याचा क्लब चालतो. तो मी बंद करणारच, असेही खासदार जलील यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.

खासदार जलील यांच्या याच भाषणाचा आधार घेत नगरसेवक अफसर खान यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘माझ्या जीवास काही झाले तर इम्तियाज जलील जबाबदार राहतील.’, असे अफसर खान यांनी तक्रारीत म्हटले आहे. एमआयएमचे काम केले नाही म्हणून मला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही अफसर खान यांनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button