Breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

अमित शहा गृहमंत्री, निर्मला सीतारमण अर्थमंत्री तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री

Share On

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी पार पडल्यानंतर शुक्रवारी सकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालयाची तर निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज शुक्रवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रीपद पुन्हा देण्यात आले आहे.

तर शिवसेनेच्या वाट्याला गीते यांच्याकडील अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले आहे. तर रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तसेच माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button