Breaking-newsराष्ट्रिय

मोदी अंतराळात जाऊन ‘एलियन मित्रों’ असंही म्हणतील: असदुद्दीन ओवेसी

एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या ए- सॅट क्षेपणास्त्रांसंदर्भात मोदींने बुधवारी देशवासियांनी माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी मोदी राजकीय स्वार्थासाठी वैज्ञानिकांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टिका केली आहे.

हौद्राबादमध्ये झालेल्या एका सभेमध्ये भाषण करता ओवेसी यांनी ‘मिशन शक्ती’च्या घोषणेवरुन पंतप्रधान मोदींना लक्ष केले. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात एक व्यंगचित्र पाहिले ज्यामध्ये मोदी अंतराळात असून तेथे ते ‘एलियन मित्रों’ असं म्हणत असल्याचे दाखवण्यात आले होते. कोणास ठाऊक काही दिवसांनी हे व्यंगचित्र खरंही होऊ शकतं. कारण मोदी काहीही करु शकतात,’ अशी उपहासात्मक टिका ओवेसी यांनी केली. मोदींने बुधवारी केलेल्या ‘मिशन शक्ती’च्या घोषणेसंदर्भात ओवेसींनी ही टिका केली.

बुधवारी पंतप्रधान मोदींनी सकाळी साडे अकराच्या सुमारास ट्विट करुन मी एका महत्वाच्या विषयाबद्दल देशवासियांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी भारताच्या ‘मिशन शक्ती’बद्दल माहिती दिली. भारताने एक फिरता उपग्रह यशस्वीरित्या नष्ट केला असून अशाप्रकारचे तंत्रज्ञान असणारा भारत आहे अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा चौथा देश झाला असल्याची माहिती मोदींने दिली होती. मोदींनी ही घोषणा केल्यानंतर ओवेसींने वैज्ञानिकांचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले होते. कठीण परिस्थितीचा सामना करत हे यश संपादन करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचे मी अभिनंदन करतो असं ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Asaduddin Owaisi

@asadowaisi

DRDO’s success today is testimony to what this nation’s scientists achieve against immense odds. My congratulations to them!

Now, @PMOIndia after all build up, you were just trying to appropriate DRDO’s success? We were expecting something more: like tangible action against Pak

905 people are talking about this

दरम्यान याच प्रकरणावरुन राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मोदींवर टिका केली होती. ‘मोदी-शहांना पहिल्यांदा गुजरातने नाकारलं, मग कर्नाटकने, त्यानंतर ५ राज्यातील जनतेने नाकारलं. मोदींच्या आता कोणत्याच क्लुप्त्या काम करणार नाहीत…मोदी सरकारने स्वतःच अपयश सैन्याच्या, वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जनतेच्या लक्षात आला आहे,’ अशी टिका मनसेने केली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button