राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याने कार्यकर्त्यांना मिळाले राजकीय ‘बळ’

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राष्ट्रीय समाज पक्षाच्या शहर कार्यकारिणीचा मेळावा थेरगाव येथे उत्साहात पार पडला.
हा मेळावा बुधवारी (दि, 2) थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात घेण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष भरत महानवर, युवक शहर अध्यक्ष छत्रपती सांगोळकर, वाहतूक आघाडी अध्यक्ष भाऊसाहेब हरणावळ, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष उमेश लोहार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष संतोष कांबळे आदी पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका निश्चित करण्यात आली. आगामी निवडणुकीत पक्ष बांधणीसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा. अवधी कमी असल्याने दिवसरात्र घराघरापर्यंत जाऊन नागरिकांच्या प्रश्नांचा आढावा घेतला पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून प्रयत्न करावा, अशा सूचना देण्यात आल्या.





