Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमधील रस्त्याच्या कामात पुन्हा रिंग – तुषार कामठेंचे आयुक्तांना पत्र

Share On

पिंपरी  ( महा ई न्यूज ) – महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून होत आहे़ त्यानंतर सत्ताधारी भाजपाने वाकडमधील रस्त्याच्या कामात रिंग झाल्याचा आरोप केला आहे.

महापालिकेच्या स्थापत्यविषयक कामात तीन ते पाच ठेकेदार आळीपाळीने निविदा भरतात. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या मदतीने रिंग करतात.  त्यानंतर प्रशासनाने ‘मी नाही त्यातली़़़’ म्हणून सारवासारव केली होती. निविदा प्रक्रिया किती पारदर्शक आहे, याचे ढोल बडविले होते. तरीही कारभार सुधारत नसल्याचे दिसत आहे.

सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देऊन निविदा चौकशीची मागणी केली आहे. तुषार कामठे म्हणाले, ‘‘स्थापत्य विभागामार्फत प्रभाग क्रमांक २५ मध्ये तीस मीटर रस्त्याचे काम आहे. भूमकर चौक या कामासाठी २४ कोटी ४० लाखांची निविदा भरण्यात आली होती. परंतु या कामात कृष्णाई, मातेरे इन्फ्रा, धनेश्वर या तीनच ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. या तीन ठेकेदारांनी रिंग केली असून, निविदेचे पहिले पाकीट उघडले असून, दुसरे पाकीट उघडल्यानंतर कोणी रिंग केली आहे. हे लक्षात येईल. निविदा पुन्हा काढण्यात यावी.’’ अशी मागणी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button