विमान प्रवाशाच्या बॅगेतून पकडला बिबट्याचा बछडा!

मुंबई – अधिक पैसे मिळविण्यासाठी प्राणी-पक्ष्यांची अवैध तस्करी होत असते. विविध मार्गांनी प्राण्यांची तस्करी करण्याच्या घटना समोर येत असताना एका विमान प्रवाशाचा चक्क बॅगेतून प्राण्याची तस्करी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. शनिवारी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली आहे. हवाई गुप्तचर यंत्रणेनेकडून करण्यात येणारया तपासात एका प्रवाशाच्या बॅगेतून बिबट्याचा १ महिन्यांचा बछडा आढळला.
बिबट्याच्या बछड्याची तस्करी करणारया प्रवाशाला हवाई गुप्तचर यंत्रणेनेकडून अटक करण्यात आली आहे. बिबट्याचा बछडा कुठून पकडला, त्याची तस्करी कुठे करण्यात येणार होती या संबंधीची चौकशी तामिळनाडू वन विभागाकडून करण्यात येत आहे. बिबट्याच्या बछड्याचे चेन्नईमधील अरिंगर अण्णा प्राणीसंग्रहालयमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे.
Air Intelligence Unit at Chennai International airport has seized a one-month-old leopard cub from the baggage of a passenger. The cub will be rehabilitated in the Aringar Anna Zoological Park in Chennai; Passenger handed over to Tamil Nadu Forest Dept for further action. pic.twitter.com/TIlNqRAYPl
— ANI (@ANI) February 2, 2019





