Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवी सांगवी पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

पिंपरी –  अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्याने त्याच्या वडिलांनी गैरसमज करून दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

साहेब गौडा पाटील अस आरोपीचे नाव असून भरधाव वेगात ट्रिपल सीट दुचाकी घेऊन त्यांचा मुलगा जात होता. दुचाकी भरधाव वेगात असल्याने अपघात झाला यात तिघेही रस्त्यावर पडले,अपघातात लहान मुलगा बचावला नागरिकांना रोष अनावर न झाल्याने दुचाकी चालवणाऱ्या मुलांना चोप दिला. त्यातील एकाने शंभर नंबरवर कॉल करत पोलिसांना बोलावून घेतले त्यानंतर पोलीस चौकीत वडिलांनी पोलीस कॉन्स्टेबल सोबत मारहाण करत धक्काबुक्की केली.

सविस्तर माहिती अशी की,रविवारी रात्री दहा च्या सुमारास १७ वर्षीय मुलगा आणि त्याचे दोन मित्र भरधाव वेगात ट्रिपल सीट दुचाकी चालवत होते.भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा अपघात झाला यात लहान मुलगा थोडक्यात बचावला. संतापलेल्या नागरिकांनी तिघांना चोप दिला. नागरिकांचा रोष पाहून तिघांपैकी एकाने शंभर नंबरला कॉल करत पोलिसांना बोलावून घेतले. तातडीने पोलिसांनी येऊन तिघांना नवी सांगवी पोलीस चौकीत आणले.

दुचाकी चालवणार मुलगा हा अल्पवयीन होता त्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले होते. अल्पवयीन मुलाचे वडील साहेब गौडा पाटील हे पोलीस चौकीत आले. मुलाला किरकोळ जखम दिसली आणि पोलिसांनीच मारहाण केल्याचा गैरसमज करून त्यांनी थेट पोलीस कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली.  सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकुंभ हे करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group