Breaking-newsक्रिडा

#HWC2018 : ऑस्ट्रेलियावर मात करत नेदरलॅंडची अंतिम फेरीत धडक

भुवनेश्वर – हाॅकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढतीत नेदरलॅंडने  पेनल्टीशूट आउटमध्ये  ऑस्ट्रेलियाचा 4-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघात 2-2 अशी बरोबरी होती. मात्र पेनल्टी शूटआउटमध्ये नेदरलॅंडने बाजी मारली.

सामन्यात शेवटपर्यंत नेदरलॅंडने 2-1 अशी आघाडी कायम ठेवली होती. मात्र शेवटची 25 सेंकद बाकी असताना आॅस्ट्रेलियाच्या एंडी ओकिंडनने गोल करत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला.

निर्धारित वेळेमध्ये नेदरलॅंडसाठी ग्लेन शूरमॅनने 9व्या मिनिटाला तर सीव वान आसने 20 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. ऑस्ट्रेलियाकडून 45 व्या मिनिटाला टीम हाॅवर्डने पेनल्टी काॅर्नरवर गोल केला. तर शेवटच्या मिनिटाला एंडी ओंकिंडनने मैदानी गोल करत सामना शूटआउटमध्ये पोहचवला.

शुटआउटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून डेनियल बील, टाम क्रेग आणि जॅक वेटनने गोल केले तर एरन जालेवस्की आणि टीम ब्राॅंड गोल करण्यात अपयशी ठरले. नेदरलॅंडकडून  जेराॅन हट्सबर्गर, सीव वान आस आणि वान डॅम थिस यांनी गोल केले तर मिरको प्रूजर आणि राॅबर्ट कॅम्परमॅन हे गोल करण्यात अयशस्वी ठरले. पेनल्टी शूटआउटमध्ये देखील सामना 3-3 असा बरोबरीत गेल्यानंतर सडन डेथमध्ये जेरोन हर्ट्सबर्गरने नेदरलॅँडसाठी विजयी गोल केला.

अंतिम फेरीत नेदरलॅंडची लढत बेल्जियमशी होणार आहे. बेल्जियमने इंग्लंडचा 6-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group