Breaking-newsपिंपरी / चिंचवड

द्रुतगती महामार्गावर कार अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

Share On

पिंपरी –  पिंपळोली गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (दि.१४)रात्री साडेसात वाजल्याच्या सुमारास कारने टँकरला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कुणाल मयुरेश्वर राजे (वय २३, रा. महेशनगर,पिंपरी) हा (एमएच-१४. ईयु ४००२ ) या क्रमांकाच्या कार मधून  शुक्रवारी मुंबई वरून पुण्याकडे येत असताना पिंपळोली गावच्या हद्दीतील द्रुतगती मार्गावरून चाललेल्या गॅस टँकर (एपी-३१.टीई. ६९५९) ला पाठीमागून कारने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी.पाटील हे करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button