पिंपरी / चिंचवड

विशालनगरात साई मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळे निलख-विशालनगरमधील हिंद मित्र मंडळ सेवा ट्रस्टच्या साई मंदिराचा प्रथम वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 23) उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिरगाव प्रती शिर्डी देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सपना लालचंदाणी, नगरसेवक कुंदन गायकवाड, शत्रुघ्न काटे, आरती चोंधे, संदीप कस्पटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव, माजी पोलीस पाटील भुलेश्वर नांदगुडे, दिलीप बालवडकर, नानासाहेब सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, आनंदा दौंडकर, चंद्रकांत दरेकर, विलास थोरात, अजय दरेकर, अमर गिलबिले, चंद्रकांत ववले, हनुमंत उभे, बाळासाहेब कांबळे, पांडुरंग बोरकर, उमाकांत ठाकरे, नारायण नलावडे, अमोल देवकर, नरेश जाधव आदी उपस्थित होते

कार्यक्रमासाठी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी व्याख्यानातून सर्व स्वामी भक्तांना समाजातील अनाथ लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश दौंडकर यांनी केले. संदीप बोडके यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button