Breaking-newsआंतरराष्ट्रीय

अमेरिकन नौदलाचे लढाऊ जेट जपानमध्ये कोसळले-वैमानिक सुरक्षित

Share On

टोकियो (जपान): अमेरिकन नौदलाचे एक लढाऊ जेट विमान जपानमध्ये कोसळले आहे. जपानच्या दक्षिण ओकिनावा बेटावर कोसळलेल्या या जेट विमानाचे दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत; अशी, माहिती ओकिनावा सुरक्षा ब्यूरोचे प्रवक्ते ओसामू कोसाकाई यांनी दिली आहे, स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे पावणेबाराच्या सुमारास ओकिनावाची राजधानी “नाहा’पासून सुमारे 250 किमी अंतरावर हे जेट विमान कोसळले.

जेट विमान कोसळल्यानंतर अमेरिकन लष्कराच्या हेलिकॉप्टरने दोन्ही वैमानिकांना सुरक्षित शोधून काढले आहे.
जेट विमानाच्या इंजीनात झालेल्या बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. समुद्रात पडलेले जेट विमानाचे अवशेष आणि व समुद्रात पसरलेले तेल यांचा शोध घेण्यासाठी जपानच्या तटरक्षक दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button