Breaking-newsराष्ट्रिय

विवाहबाह्य संबंधांतून शिक्षिकेची हत्या, मॉडेलला अटक

Share On

दिल्लीतील बवाना येथील शिक्षिकेच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. शिक्षिकेच्या पतीचे एका मॉडेलशी संबंध होते आणि या संबंधांना विरोध केल्यानेच शिक्षिकेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेचा पती मनजित (वय ३८), मॉडेल अँजल गुप्ता आणि तिच्या वडिलांना अटक केली आहे. या तिघांनी हत्येसाठी सुपारी दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बवाना येथे सोमवारी सुनीता (वय ३८) या महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुनीता या हरयाणातील सोनीपत येथील सरकारी शाळेतील प्राथमिक विभागात शिक्षिका होत्या. या हत्येचा पोलिसांनी तपास सुरु केला होता. सुनीताच्या कुटुंबीयांनी हत्येप्रकरणी तिच्या पतीवरच संशय व्यक्त केला होता. मनजितचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी संशयाच्या आधारे तीन जणांना अटक केली आहे.

मनजितचे मॉडेल अँजल गुप्ताशी विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांना सुनीताचा विरोध होता. सुनीता अडथळा ठरत असल्याने मनजित, अँजल आणि तिच्या वडिलांनी सुनीताच्या हत्येचा कट रचला. त्यांनी सुपारी दिली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button