Breaking-newsमुंबई

शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्सची ७९२ अंकांची घसरण

आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स ७९२ अंकांनी घसरला. सेन्सेक्स ३४ हजार ३७६.९९ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये २८३ अंकांची घसरण बघायला मिळाली. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एका दिवसात ४.१९ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तरीही म्युच्युअल फंड आणि एसआयपी यातली गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांनी सोडू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

View image on Twitter

ANI

✔@ANI

#Sensex closes at 34,376.99, down by 792.17 points

याआधी बुधवारी जेव्हा बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला होता तर निफ्टीतही ८३ अंकांची घसरण बघायला मिळाली होती. रुपयाचे सातत्याने होत असणारे अवमूल्यन याचा परिणाम निर्देशांकावर गेल्या काही दिवसांपासून दिसतोच आहे. त्याचाच परिणाम आजही बघायला मिळाला.
ऑईल अँड गॅस, बँकिंग, मेटल, ऑटो, एफएमसीजी, पॉवर या सगळ्यांच्या शेअर्सवर परिणाम झालेला बघायला मिळाला. महत्त्वाच्या शेअर्समध्ये एचपीसीएल २४ टक्के, बीपीसीएल २० टक्के, आयओसी १६ टक्के, ओएनजीसी १४.७ टक्के, गेल १० टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ६.३ टक्के, अदानी पोर्ट ५.४ टक्के, एसबीआय ४.७ टक्के आणि भारती एअरटेल ४.३ टक्के घसरून बंद झालेले बघायला मिळाले. तर इन्फोसिस, टीसीएस, टायटन आणि इंडस्ड बँक यांचे शेअर्स २.५ टक्के ते १.४ टक्क्यांपर्यंत वधारून बंद झाले. असे असले तरीही गुंतवणूकदारांनी एसआयपी किंवा म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक करणे सोडून देऊ नये असे आवाहन शेअर विषयक तज्ज्ञांनी केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group