Breaking-newsआंतरराष्ट्रीय
मलेशियाच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक

क्वाललांपुर – मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांच्या पत्नी रोसमाह मन्सोर यांना सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आज अटक केली. सरकारी निधीचा अपहार केल्या प्रकरणी तीन वेळा त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. त्यांचे महागडे आणि ऐषआरामी राहणीमान आणि त्यांच्या दागदागिने तसेच उंची वस्तुंच्या हव्यासाच्या अनेक कथा तेथे प्रसिद्ध आहेत. त्यांना तपास यंत्रणेच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर सरकारने एकूण 20 आरोपांखाली गुन्हे नोंदवले आहेत. यातील बहुतेक गुन्हे हे भ्रष्टाचार आणि अपहराशी संबंधीत आहेत. स्वता नजीब यांचीही सरकारकडून भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांवरून चौकशी सुरू आहे.





