सुषमा स्वराज घेणार पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्र्यांची भेट

सुषमा स्वराज घेणार पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्र्यांची भेट

भारताने पाकिस्तानची विनंती मान्य केली आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली म्हणून पाकिस्तान संबंधीच्या आमच्या धोरणात लगेच कोणताही बदल होणार नाही किंवा द्विपक्षीय चर्चाही सुरु होणार नाही असे असे भारताने स्पष्ट केले आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट होईल. बैठकीसाठी आम्ही मुद्देही अजून निश्चित केलेले नाहीत फक्त बैठकीसाठी होकार कळवला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *